5 सोपे योगासन करून तुम्ही राहा चुस्त आणि निरोगी


शरीराला तंदुरूस्थ ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला जास्त फायदे होतात. तसेच योगसनाचे कही सोपे प्रकार आहेत ज्याचा उपयोग आपण दररोजच्या जीवनात करू शकतो.
 १. ताडासन 
ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाचे ताडासन असे नाव आहे. ताडासन केल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. ताडासन नियमित केल्याने पायांचे स्नायू व पंजे मजबूत होतात. तसेच छाती आणि पोट यांच्यावर ताण पडल्याने त्याच्या संदर्भात असलेले आजार दूर होतात. वीर्यशक्तिमध्ये वाढ होऊन मुळव्यधी असलेल्या व्यक्तीला यापासून आराम पडतो. ताडासन लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
२. भुजंगासन
या आसनात शरीराचा आकार सापा सारखा बनतो अर्थात भुजंगासारखा म्हणूनच या आसनाला भुजंगासन असे म्हटले जाते. सर्व प्रकारच्या जुन्या आजारांमध्ये या आसनाचा फायदा होतो. या आसनाने गळा, पोट पाठ आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. यामुळे आपल्या पित्ताशयाची क्रियात्मकता वाढते. पचन शक्ती वाढ होण्यासाठी हे फायदेकारक आहे. पोटावरती निर्माण झालेली अतिरिक्त चरबीही हे आसन केल्याने कमी होते, आणि आपण सुडौल दिसायला लागता.
३. उष्ट्रासन
या आसनस्थितीत शरीराची अवस्था उंटाच्या आकाराची होते म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात. या आसनामुळे गुडघे, ब्लडर, किडनी, यकृत, लिव्हर, फुप्पुसे, मानेचा भाग यांना चांगला व्यायाम मिळतो. हे आसन केल्यास शरीरात स्फूर्ती निर्माण होते. श्वास, पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ट, अपचन, एसिडिटी दूर होण्यास मदत होते.
४. गोमुखासन
पादो भूमौ च संस्थाप्य पृष्ठपाश्र्वे निवेशयेत। स्थिरकायं समासाद्य गोमुख गोमुखाकृति:।। गोमुख म्हणजे गाईचे तोंड या आसनांत पायाची रचना गोमुखासारखी भासते व पावले तिच्या कानाप्रमाणे वाटतातत म्हणून या आसनास गोमुखासन नाम प्राप्त झाले आहे. हठयोगप्रदीपीका व घेरंडसंहिता या दोन्ही ग्रंथामध्ये या आसनाचा उल्लेख आहे. या असनामुळे छातीच्या वरचा भाग खांदे मान दंड यांच्या स्नांयुना ताण पडून व्यायाम मिळतो व बळकटभ येते मानेचे विकार कमी होतात. पाठदुखी थांबते कुबड येऊ नये किंवा कुबड असल्यास ते कमी व्हावे म्हणून भुजंगसासनाबरोबर या आसनाचा उपयोग होतो. मन प्रसन्न होते व ताजेतवाणे वाटते. एकाग्रता व मन:शांती करिता हे आसन उपयुक्त.
५. शवासन
शव म्हणजे अर्थातच मृतदेह. आपल्या शरीराला मृतावस्थेसारखे करणे म्हणजेच शवासन. मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, निद्रानाश यावर हे आसन उपयुक्त आहे. या आसनात मन शरीराशी जोडले गेलेले असते. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे बाहेरचे विचार उत्पन्न होत नाहीत. त्यामुळे मन विश्रांत अवस्थेत असते. शरीराचा सगळा थकवा दूर होतो.

Comments