किवी या फळामध्ये नक्की दडलयं काय?
आरोग्यासाठी फळे ही सर्वात उत्तम असतात आता सर्वानीच मान्य केले आहे . आंबा सफरचंद संत्री केळी किलगड अशा आपल्याकडच्या फळांचे गुण सर्वसाधारणपणे माहिती असतात . मात्र गेल्या दोनेक वर्षांत थायलंड - मलेशिया - चीनवरून येत असलेल्या विदेशी फळांनी बाजारात लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे . सर्वांत जास्त लक्षवेधनार फळ म्हणजे किवी … न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेला किवीशी साधर्म असल्यामुळे याचे नाव किवी ठेवण्यात आले आहे . या फळाची लागवड न्यूझीलंड , फ्रान्स , इटली , जपान व अमेरिकेत जास्त होते . आता भारतातही उत्तर व ईशान्येकडील भारतातील राज्यात लागवड करून निर्यातही केली जाते . साधारणत ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किवीचा मोसम असतो . किवी फळाचे फायदे किवीमध्ये ‘ क ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे व शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम करते तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते . संधिवात , दमा, आमवात यासारख्य...