महाबळेश्वर एक थंड हवेचे ठिकाण
महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण. महाबळेश्वर पाचगणीचा तो निसर्गरम्य परिसर होय. जुने महाबळेश्वर व नवे महाबळेश्वर असे महाबळेश्वराचे दोन भाग करण्यात आले आहेत. मधील भाग ब्रम्हारण्याने व्यापला असून दोन्ही भागंामध्ये ५ कि. मी.चे अंतर आहे.
समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण व पर्यटनाचे महत्वाचे केंद्र कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या पाच नद्या येथून उगम पावतात.
या पंचगंगेचे येथे एक देऊळ सुद्धा आहे. वेण्णा तलावात नौकाविहाराची सोय देखील येथे आहे. वनखात्यातर्फे पर्यटकांसाठी वनसहलीचे आयोजन करण्यात येते. येथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजाने तेराव्या शतकात बांधले. अफझल खानाच्या तंबूवरचे कापून आणलेले हे सुवर्ण कळस महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले आहे. विल्सन पॉईंट व माखरिया पॉईंट, केल्स पाँईंट, एको पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, विडो पॉईंट,कसल रॉक व सावित्री पॉईंट, मार्जोरी पॉईंट, एल्फिन्स्टन पॉईंट, कॅनॉट पीक हंटर पॉईंट,नॉर्थकोर्ट पॉईंट, लॉडविक पॉईंट, बॉम्बे पॉईंट, हत्तीचा माथा, चायनामन धबधबा, फाकलेड पॉईंट इ.पॉईंट आहेत.
निसर्गाची विभिन्न रुपे पाहण्यासाठी या ठिकाणी सामान्यापासून ते पदाधिकार्यांपर्यंत अनेक लोक येतात. महाबळेश्वरास बालकविनी घिनसर्गदेवतेला पडलेले सुंदर स्वप्न असे म्हटले आहे. या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे. विल्सन पॉईंट जवळच गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. येथे गव्हावरील तांबोरा रोगाचा अभ्यास व संशोधन चालते. कोयना धरणाचा शिवसागर जलाशय व कांदाटी खोर्यातील घनदाट जंगलांच्या परिसरात नवे महाबळेश्वर अर्थात जलारण्य प्रकल्प हा खास पर्यावरण दृष्ट्या आकर्षक प्रकल्प विकसित होत आहे.

Comments
Post a Comment