आंबा फळांचा राजा का आहे वैशिष्ट्य जाणून घ्या
उन्हाळा येताच चाहूल लागते ती फळांच्या राजाच्या आगमनाची म्हणजेच आंबा… अवीट गोडीच्या या फळाला ‘कोकणचा राजा’ असं म्हणतात. या फळाचा मोसम एप्रिल ते जून हा आहे. असं असलं तरी आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे सांगता येत नाही. दक्षिण अणि दक्षिण पूर्व आशियामध्ये मोठया प्रमाणात जैववैविध्य पाहता इथेच उगम झाल्याचं मानण्यात येतं. दक्षिण आशिया तथाभारताच्या संस्कृतीत आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंबा हे भारत आणि पाकिस्तान देशांचं ‘राष्ट्रीय फळ’ आहे तर बांगलादेशचं ‘राष्ट्रीय झाड’ आणि फिलिपाइन्सचं ‘राष्ट्रचिन्ह’ आहे.
भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नाडिस, रायवळ इ. जाती आहेत. कच्च्या आंब्याला ‘कैरी’ असं म्हणतात कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो तर पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो. आंब्याच्या फुलांना मोहर असे म्हंटले जाते. त्याला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील या प्रकारातील असते. या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कोय असते.आंब्याच्या गरात थायमीन, नायसिन, रिबोफ्लेवीन, पायरीडॉक्सीन असतं. तर खनिजांपैकी कॅल्शियम, तांब, लोह, मॅग्नेशियम आणि मॅगनीज अधिक प्रमाणात असतं.
- कोयीचा गर काढून चावून खाल्ल्यावर अजीर्ण, पोटदुखी, जुलाब आदी विकारांवर आराम मिळतो.
- आंब्यामध्ये आढळून येणारे न्यूट्रिएंट्स आणि व्हिटॅमिन्स त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.
- केसांत कोंडा किंवा खाज येत असेल त्यांनी आंब्याचा मोहोर, खोबरेल तेल आणि थोडं पाणी उकळून ते तेल टाळूला लावावं.
- आंब्याची पानं सकाळी उठून चघळल्याने हिरडया मजबूत होतात. तसंच दातातून येणारं रक्त थांबतं.
- आंब्याची पानं चार कप पाण्यात उकळून ते पाणी एक कपभर आटवावं. हे पाणी गाळून बाटलीत ठेवावं. आणि डोळ्यांमध्ये ड्रॉप्स म्हणून वापरावं. म्हणजे डोळ्यांतून वारंवार पाणी येणे, सूज येणे, धूसर दिसणे, डोळे थकणे, रांजणवाडी आदी विकारांवर हे थेंब डोळ्यांत घातल्यास आराम पडतो.
- आंब्याच्या कोयीचं चूर्ण मुरगळणे, लचकणे, सूज येणे या समस्यांवरही गुणकारी आहे.

Comments
Post a Comment