या वेळी केळी खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे



जेवनानंतर फळे खाने आरोग्यास अधिक फायदेशिर असतात. आपल्या तब्बेतीसाठी जेवनानंतर सगळ्यांनी मोसमी फळ ही खाल्ली पाहिजेत. फळाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्याद्वारे आपल्या शरीराला आवश्यक ते प्रोटीन तसेच विटामिन मिळत असतात. शरीरातील रोग प्रतिकारक शक्ति वाढीस लागते. फळांमध्ये केळी हे फळ तर आहेच परंतु ते एक उत्तम आहार आहे. केळी खाल्याने भूख शमते  केळी आरोग्याला लाभदायी असतेतसेच केळी खाण्याचे खुप फायदे शरीराला होतात.
पिकलेल्या केळीत आयोडीन, साखर प्रोटीन आढळतात तर कच्च्या केळीत कॅल्शियम अधिक असते. कच्च्या केळीची भाजी ही केली जाते.
दररोज केळी खाल्याने पचनक्रिया सुरळीत चालते. एक ग्लास दूधात एक चमचा शुध्द तूप चिमुटभर इलायची पुड मिसळा एक केळी खा त्यानंतर एका दमात दूध गटकावे. अशाप्रकारे दररोज दोन केळी खाल्याने शरीर सुडौल सुदृढ होत असते. वीर्य तसेच शुक्राणूची (स्पर्म) वृध्दी होते. स्मरणशक्तीसह कामशक्ती ही वाढते. महिलांमध्ये प्रदर रोग ठीक करण्यास मदत होते.
दोन चमचे मधुसोबत, दोन केळी खाल्याने हृदयरोग तसेच हाई ब्लड प्रेशरच्या व्याधी असलेल्याना आराम पडतो. मूत्र समस्या सुटतात. काही दिवस दररोज कच्च्या केळीची भाजी खाल्यास पोटात असलेले जंत किंवा किटक मलमूत्राद्वारे बाहेर फेकले जातात.
सकाळी न्याहारी मध्ये दोन ते तीन केळे खालल्यामुळे लंच पर्यंत भूक लागत नाही. जर तुम्ही खेळाशी संबंधीत आहे तर आपल्या डाइट मध्ये केळे शामिल करा. वर्कआउट केल्या नंतर बॉडी मधील एनर्जी कमी होत नाही. अश्या स्थिती केळे एनर्जी देते.

Comments