शरीर निरोगी राखण्यासाठी काय करावे
आजारी पडायला कुणालाही आवडत नाही. कारण त्यामुळं सगळ्यांनाच त्रास होतो आणि खर्चही वाढतो.
आजारपणात दुसऱ्यांना आपली काळजी घ्यावी लागू शकते; औषधोपचारासाठी बराच खर्च होऊ शकतो. “इलाजापेक्षा प्रतिबंध बरा,” अशी एक म्हण आहे; म्हणजे आजारी पडून उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी.
निरोगी राहण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्यांचा उपयोग आपण दैनंदीन जीवनात केला पाहिजे.
१. कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने पचनसंस्था
स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. तसेच वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
२. लसणाच्या तीन पाकळ्या चघळून त्यावर कपभर लिंबूपाणी प्यायल्याने लठठपणा कमी होण्यास मदत होते. हा प्रयोग रिकाम्यापोटी केल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधरते.
३. सकाळी किमान एक खजूर रिकाम्यापोटी खाल्याने अॅनिमियाचा त्रास कमी होतो. खजूरमधील आयर्न घटक हिमोग्लोबीन नियंत्रणात आणतात.
४. कढीपत्त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. इन्सुलिनच्या निर्मितीचेही कार्य सुधारते. सकाळच्या नाश्त्यामध्ये कढीपत्ता खाणे आरोग्यास फायद्याचे आहे.
५. ग्लासभर पाण्यात जिरे मिसळून पाणी प्यायल्याने हृद्याचे कार्य सुधारण्यास तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यातील पोटॅशियम घटक आरोग्य निरोगी ठेवते.
६. रोजच्या आहारात साखर, मीठ आणि तेल या तीन गोष्टींचा कमी प्रमाणात वापर केलात तर तुम्ही लठ्ठपणा, हाय ब्लडप्रेशर, मधुमेह आणि हृदयविकार अशाप्रकारचे आजार होण्यापासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता.
आपल्या जीवनशैलीत बदल करा आणि निरोगी रहा.
८. प्राणायाम केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच वारंवार होणारे पडसे, दमा, पचनाच्या तक्रारी आदी व्याधीही घटतात.

Comments
Post a Comment