किवी या फळामध्ये नक्की दडलयं काय?



आरोग्यासाठी फळे ही सर्वात उत्तम असतात आता सर्वानीच मान्य केले आहे. आंबा सफरचंद संत्री केळी किलगड अशा आपल्याकडच्या फळांचे गुण सर्वसाधारणपणे माहिती असतात. मात्र गेल्या दोनेक वर्षांत थायलंड- मलेशिया-चीनवरून येत असलेल्या विदेशी फळांनी बाजारात लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहेसर्वांत जास्त लक्षवेधनार फळ म्हणजे किवीन्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेला किवीशी साधर्म असल्यामुळे याचे नाव किवी ठेवण्यात आले आहे. या फळाची लागवड न्यूझीलंड, फ्रान्स, इटली, जपान अमेरिकेत जास्त होतेआता भारतातही उत्तर ईशान्येकडील भारतातील राज्यात लागवड करून निर्यातही केली जाते. साधारणत ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किवीचा मोसम असतो.

  • किवीमध्येजीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम करते तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. संधिवात, दमा, आमवात यासारख्या रोगांवर किवी हे फळ गुणकारी ठरते. ह्या फळामध्ये तंतूचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेहींसाठीही उपयोगी ठरते.

  • किवीमध्ये नैसर्गीकरीत्या रक्त पातळ कमी करण्याचे गुणधर्म असल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्या तसेच हृदयविकार असणाऱ्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे.

  • पोटॅशियम पाणी अधिक असल्याने लघवीच्या जागेवर खाज येत असल्यास किवा जळजळ होत असल्यास किवी खाल्ल्याने फायदा होतो.

  • किवीतके जीवनसत्त्व असल्याने फळाचा गर एखाद्या चटका लागलेल्या भागावर लावल्यास जखम लवकर भरून येते. पचन सुरळीत होण्यास हे फळ मदत करते.


Comments