महाराष्ट्राची राजधानी रायगड किल्ला



रायगड किल्ला हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ स्थान. मराठा साम्राज्याची राजधानी म्हणजेच रायगड किल्लामहाराष्ट्रात सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर रायगड हा किल्ला आहे. रायगडाचे प्राचीन नावरायरीहे होते. छत्रपति शिवरायांनी, एप्रिल, १६५६ रोजी रायगडास वेढा घातला मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला. रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.

महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झालामहाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा." महाराजांच्या काळात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक-खुबलढा बुरुज दोन-नाणे(नाना)दरवाजा. याशिवाय कठीण अश्या हिरकणी कड्यावरुन उतरणार्या हिरकणीची कथा प्रसिद्ध आहेच

महाराष्ट्राची राजधानी रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नावगंगासागर तलावअसे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्गमहा-दरवाजामधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्यालाहिरकणी बुरूजअसे म्हणतात.

Comments