महाराष्ट्राचे सण महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती



महकवी कालिदास यांनी सणांबद्दल उत्सवप्रियः खलु मनुष्यः”  पंक्ति लिहिल्या आहेत आणि ते खरेच आहे. माणूस हा खरोखर एक उत्सवप्रिय आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात भारतीय संस्कृती सण आणि उत्सवांना विशेष महत्व आहे. सण असो किंवा कोणताही समारंभ असो त्यात सर्वजण उत्साहने सहभागी होतात. सण उत्सव व्रते या स्वरुपात आपल्याला थोर दिर्घकालीन वारसा लाभला आहे.हा वारसा जोपासलाआहे विषेश म्हणजे भारतीय संस्कृती ही आजपर्यत टिकून आहे त्याचे सर्वात जास्त श्रेय येथील सण आणि उत्सवांनाच आहे.कारण प्रत्येक सण हा या देशाच्या वेगवेगळ्या संस्कृतीचे प्रतिक आहे. प्रत्येक सणात आपल्या संस्कृतीचे प्रतिक दिसते.

सातशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात देवगिरीच्या यादव राजाची सत्ता होती. यादवांच्या मुत्सद्दी कारभारीथोर, स्थापत्यशास्र्, मोडी लिपीचा प्रवर्तकहेमांद्री तथा हेमांडपत याने त्यावेळी चतुवर्गचिंतामाणी’ नावाचा एक ग्रंथ पाच खंडातून लिहीला. वर्षतील तीनशे पासष्ट दिवसात कोणते सण साजरे करावेतकोणत्या  व्रतांचे पालन करावे, हे सांगणारा ग्रंथ लिहिला. यावरून त्यावेळच्या समाजजीवनाचे दर्शन घडते. तसेच माणसांच्या एकत्र येण्यातूनच सण- उत्सवांची निर्मिती झाली अणि आज ते आपल्या भाषेचे, संस्कृतीचेधर्मभावनेचे अविभाज्य घटक बनले आहेत. हे सण साजरे करण्यामागे शैक्षणिकधर्मिक, सांस्कृतिकसामाजीक असे अनेक कारणेआहेतपण त्याचप्रमाणे व्यापक असा समाजरचनेचा घटक म्हणजे कुटुंब यासाठीही सणांना मोठ्या प्रमाणात महत्व असते.

भारत हा विविधतेने नटलेला आहे वेगवेगळे पंथ, जात, धर्म, भाषाविचारही वगवेगळे आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती जरी एकात्म असली तरी येथील सण- उत्सव साजरे करण्यातही विविधता आहे. एकच सण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पध्द्तीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात अनेक सण साजरे होतात. त्यात गुढीपाडवा हा नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. तसेच  दसरा, दिवाळी, नवरात्र, नारळी, पोर्णिमा, गणपती, होळी असे मोठे सण सर्व ठिकाणी साजरे होतात.

Comments