हे आहेत आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे!



प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतो ते म्हणजे उन्हाळा सुरू होताच. आंब्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद आपण घेऊ शकतो. मॅँगो शेक, पन्हे, आमसर, चटणी इत्यादी. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे आंबा आरोग्यदायी आहे. त्याचे अनेक फायदे असले तरी अति खाण्यामुळे नुकसानही होऊ शकते. तर जाणून घेऊया आंबा खाण्याचे फायदे अन् तोटे...

आंबा खाल्ल्यामुळे होणारे फायदे
  • आंब्यात व्हिटॉमिन , कॉपर, आयर्न, आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. उन्हाळ्यात आंबा खाणे फायदेशीर ठरते.
  • आंब्यापासून शरीरास ऊर्जा मिळते कारण आंब्यात शर्करा असते. त्यामुळे तुम्हाला ऐक्टिव्ह वाटते. उन्हाळ्यात आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणे अधिक फायदेशीर ठरेल.
  • आंब्यात व्हिटॉमिन सी जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर चेहऱ्यावरची चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात.

आंबा खाल्ल्यामुळे होणारे तोटे

  • एका मध्यम आकाराच्या आंब्यात सुमारे १५० कॅलरीज असतात. त्यामुळे आंबा हे फळ अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
  • जेवल्यानंतर आंबा खाल्याने कॅलरीजचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे सकाळी, संध्याकाळी नाश्ता, स्नॅक्स म्हणून आंबा खाणे जास्त फायदेशीर ठरेल. त्यामुळे कॅलरीजही नियंत्रित राहतील.
  • अधिक प्रमाणात आंबा खाल्याने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे जास्त प्रमाणात आंबा खाऊ नका. एका दिवसात एक किंवा दोनपेक्षा अधिक आंबा खाणे टाळा. आंबा कोणाला आवडत नाही. आंबा आवडणारी व्यक्ती दुर्मिळच असेल. मात्र आंबा कितीही चविष्ट असला तरी त्याचे अति सेवन टाळणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरेल.

Comments