निसर्गाच अद्भूत व सुंदर देण चिखलदरा



वैविध्यतेने संपन्न असलेल्या मेळघाटचा पूर्व वनप्रदेश म्हणजे चिखलदरा. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले विदर्भातील एकमेव थंड हवे ठिकाण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि गुगामल नॅशनल पार्क याच भागात आहे. गाविलगड नर्नाळा किल्ला परिसरात आहेत. विविध प्राणी जैविक वनस्पती वनांनी हा प्रदेश समृद्ध आहे. हिरवळीचा गालिचा पांघरलेला हा प्रदेश मन मोहून घेतो. त्याचवेळी दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा खोल दर्या श्वास रोखून धरायला लावतात.

'चिखलदरा' हे महाराट्रातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वंतरांगेत थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी खुणावत असते. चिखलदरा या ठिकाणाला एक मनोरंजक इतिहास आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पार महाभारतात जावे लागते. पाच पांडव वनवासात असताना त्यांनी काही काळ चिखलदर्यात घालवला होता, असे म्हणतात. भीमाने येथील राजा कीचकचा वध करून एका दरीत फेकून दिला होता. ती दरी म्हणजेच कीचकदरी होय. परंतु, कालांतराने कीचकनरीचे रूपांतर चिखलदरीत झाले चिखलदरीचे चिखलदर्यात. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भात सर्वाधिक ऊन असते. निसर्गाची शितलता अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात.

चिखलदरा येथील हजारो फूट खोल दर्या या पर्यटकांचा काही काळ श्वास रोखण्यास कारणीभूत ठरतात. दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने अंघोळ केली होती, त्यामुळे या कुंडाला भीमकुंड असे नाव पडले आहे असे म्हणतात.

प्रेक्षणीय स्थले म्हणजे देवी पॉईट, पंचबोल पॉईट. वॉटर बोटींग दुचाकीवरून मस्त फिरण्यासाठी भीम कुंड, वन उद्यान, या परिसरातील लोकांनी तयार केलेल्या वस्तूंचे संग्रहालय ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथील कॉफिचे मळेही पहाण्यासारखे आहेतपंचबोल पॉइंट (इको पॉइंट) तर पर्यटकांना चक्राऊन टाकणारा आहे. चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो.

जाण्याचा मार्ग
जवळचे विमानतळ- नागपूरपासून 4 तासांच्या अंतरावर
जवळेचे रेल्वे स्टेशन- बडनेरा, अमरावती
बससेवाअमरावती- चिखलदरा (100 किमी अंतरावर)
नागपूर- चिखलदरा 230 कि.मी. एसटी खासगी बसेस उपलबध
मुंबई- चिखलदरा 800 किमी अंतरावर



Comments