पाचगणी एक नैर्सर्गिक सुंदरतेच ठिकाण



महाराष्ट्रातील पाचगणी हे लोकप्रिय हिल स्टेशन मधील एक स्टेशन आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच व सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. महाबळेश्र्वर - पाचगणी जवळच छत्रपती शिवाजी महाराज - अफजलखान यांची भेट झाली. महाबळेश्वर आणि पाचगणी ब्रिटिशांसाठी उन्हाळ्यात निवडण्याचा पर्याय होता

हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक आहे. हे महाराष्ट्रातील नैसर्गिक आणि सुंदर परिसर तसेच हवामानामुळे हे महाराष्ट्रातील आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पाचगणीला अद्भुत नैसर्गिक सौंदर्य व आरामदायक वातावरणासह आशीर्वादित आहे. पाचगणी सातारापासून जवळपास ४८.७ कि.मी. अंतरावर आहे व पुणे शहरापासून जवळपास १०१.५ कि.मी. अंतरावर आहे. पाचगणी हिल स्टेशन सरासरी समुद्र सपाटी १३३४ उंची मीटर आहे आणि हि उंची महाबळेश्वर पेक्षा ३८ मीटर कमी आहे. हे हिल स्टेशन डोळ्याना सुखकारक आहे जेणे करुन संपूर्ण वर्षभर पर्यटकांना आकर्षित करते. हिल स्टेशन संपूर्ण वर्षभर सुखद वातावरण असते.

पाचगणी आणि महाबळेश्र्वर ही दोन्ही ठिकाणे अनेक प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरकडे दाट झाडी चिंचोळे मार्ग पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. स्ट्रॉबेरी, तुती, केशरी गाजरे, मध, या सोबतच जॅम - जेली, सरबते तयार करणार्या कंपनीच्या उत्तम बागा हेदेखील पाचगणीचे आकर्षण आहे. रोपवाटिकांमधून मिळणार्या विविध फुला-फळांच्या रोपांची रेलचेल, यामुळे पाचगणीच्या निसर्गरम्य वातावरणात भर पडली आहे. सह्याद्रीच्या माथ्यावर टेबललँड प्रमाणेच पाच टेकडया आहेत. या भागालाच पाच गडांची भूमी पांचगडी त्याचा भ्रंश होऊन पाचगणी असे नांव पडले आहे. येथे येणार्या पर्यटकांना टेबललँडचे विशेष आकर्षण आहे. थंड कोरड्या उत्साहवर्धक हवामानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते त्यामुळे पाचगणीला आरोग्य धाम असे म्हणण्यात येते.

पाच डोंगरावर वसलेले गाव म्हणून म्हणजेच पाचगणी. थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर लौकिकास आले आहे. प्रेक्षणीय विविध पाईंटस किडीज पार्क आणि भिलार टेबललँड, कृष्णा रिवर, टेबल लैंड,  राजपुरी गुहा, डेव्हिल्स किचन आणि पारसी पॉइंट  आहेत. शिवाय मॉरल रिआर्मामेंट सेंटर आहे. येथे देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गुरेघर येथे मॅप्रो फ्रुट प्रॉडक्टस ही जाम फॅक्टरी एकर परिसरात आहे. तेथील ग्रीन हाऊसमध्ये शेकडो प्रकारचे कॅक्टस पहायला मिळतात.





Comments