ताक कधी पिऊ नये व कोणी पिऊ नये
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताकाचे सेवन योग्य प्रमाणात केल्यावर शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असल्याने शरीराला अतिशय जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी शरीरात पाणीयुक्त घटक जास्त जाणे आवश्यक असते. यासाठी शरीराला गारवा मिळावा पाण्याचे प्रमाण प्रमाणशीर राहावे म्हणून वेगवेगळे शीतपेय घेतले जातात. तसेच ताक पिण्याचे काही तोटे सुद्धा आहेत ताक कधी पिऊ नये व कोणी पिऊ नये हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
१) फुफ्फुसाला जखम होऊन थुंकीमधून रक्त पडत असल्यास त्या व्यक्तिने ताकाचे सेवन करू
नये.
२) अशक्त व कृश व्यक्तिने ताक पिऊ नये.
३) चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, अंगाची आग होणे ह्या तक्रारीमध्ये ताक पिऊ नये.
४) कोड, अंगावर पुरळ येणे, त्वचा रोग, गळवे होणे, मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव अधिक होणे अशा तक्रारी मध्ये ताक प्यायचे नाही.
५) पित्ताचा त्रास जसे तोंड येणे, अंगावर पित्त उठणे, पोटात आग होणे, कावीळ, तोंड आंबट कडू होणे, पुष्कळ तहान लागणे,खुप घाम येणे अशा तक्रारी मध्ये ताक पिणे अयोग्य आहे.
६) उन्हाळा व शरद ऋतुमध्ये ताक पिंऊ नये.
७) घोळ हा ताक प्रकार प्यायचा असल्यास दह्याचे सर्व नियम पाळावे.
८) सर्दी,खोकला होण्याची सवय असणाऱ्यांनी जेवणानंतर,सकाळी दहा पुर्वी व संध्याकाळी ७ नंतर ताक पिऊ नये.

Comments
Post a Comment